


व्हिजन (दृष्टीकोन):
समाजातील सर्व गरजू व पीडितांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पुरवून एक निरोगी व सुदृढ समाज निर्माण करणे.
आरोग्य हेच खरे धन” या तत्त्वावर आधारित सेवा करून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे.
सर्वांसाठी मोफत, दर्जेदार व विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून निरोगी समाजाची निर्मिती करणे.
श्रद्धा, सेवा आणि समर्पण या मूल्यांच्या आधारे विश्वासार्ह आरोग्यसेवेचे केंद्र म्हणून समाजात ओळख निर्माण करणे.
मिशन (ध्येय):
सर्व प्रकारच्या रुग्णांना मोफत उपचार सेवा देणे.
आरोग्य तपासण्या व चाचण्या अतिशय अल्प दरात करून समाजातील वंचित घटकांनाही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे.
दुःखी व पीडित लोकांना वैद्यकीय सेवेद्वारे आधार देणे आणि त्यांचे आरोग्य पुनर्संचयित करणे.
लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास प्रवृत्त करणे.
रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा या भावनेने प्रत्येक रुग्णाकडे सहानुभूती, प्रेम व जबाबदारीने पाहणे.
ग्रामीण व शहरी भागातील जनतेला सुलभ, परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेने सहानुभूतीपूर्वक व परवडणाऱ्या आरोग्य सेवांचा प्रसार करणे.
डॉ. सागर रविंद्र इधोळ [MBBS. MD (Medicine)] संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष श्री दादा दरबार धर्मार्थ ग्रामिण रुग्णालय बाळापूर.
डॉ. सागर हे कसुरा ता. बाळापूर येथील रहीवासी असुन त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्या नंतर श्री दादाजी धुनीवाले यांच्या दादा दरबार हॉस्पीटल बडवाह जि. खरगोन [मध्य प्रदेश ] धर्मार्थ रुग्णालय सेवा प्रदान केली व त्या नंतर श्री दादाजी धुनीवाले यांच्या आशिर्वादाने व छोटे सरकार यांच्या मार्गदर्शना खाली अकोला येथे श्री दादाजी धुनीवाले बहुउद्देशीय संस्थेची दि. 13/1/2025 रोजी स्थापना केली. या संस्थेअंतर्गत श्री दादा दरबार धर्मार्थ ग्रामिण रुग्णालय बाळापूर येथे दि. 8/07/2025 रोजी स्थापना करुण सर्वांसाठी मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुण देण्यासाठी एक पाउल टाकले आहे. या व्यतिरीक्त डॉ. सागर इधोळ सर हे आयकॉन हॉस्पीटल अकोला यांचे संचालक म्हणून देखील कार्यरत आहेत.
संस्थाचे नाव : श्री दादाजी धुनीवाले बहुउद्देशीय संस्था अकोला.
नोंदणी क्रमांक : Akola/0000027/2025
डॉ. श्रुती सागर इधोळ [M.B.B.S DDV FAM] सचिव श्री दादाजी धुनिवाले बहुउद्देशिय संस्था अकोला.
डॉ. श्रुती सागर इधोळ, डॉ सागर
यांच्या पत्नी असुन त्या देखील श्री दादा दरबार धर्मार्थ ग्रामिण रुग्णालय बाळापुर येथे
[Tele Consultation] द्वारे गरजू रुग्णांना मोफत सेवा देतात.
डॉ. श्रुती या Derma Care Skin Hair And Laser Clinic, Akola चा संचालिका आहेत.